Mazha Career Guide Foundation

करिअर इन लाईफ सायन्सेस या विषयावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन

माझा करियर गाईड फौंडेशन, लातूर,अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था शाखा,लातूर आणि अरिहंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत दिनांक-६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ०३:३०वाजता झूम द्वारे करियर गाईडन्स चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अॅड.वैशालीताई वालचाळे( संचालक -सन्मती इंजिनीरिंग कॉलेज, वाशीम ) उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती – मा.कमलकिशोर देशभूषण कंडारकर(IAS अधिकारी ) व प्रमुख पाहुणे-मा .अभिजित जिनचंद्र वायकोस-(IFS अधिकारी ताडोबा अभयारण्य ) आणि  डॉ. वर्धमान उदगीरकर( सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ – श्वास हॉस्पिटल, लातूर) यांची उपस्थिती होती. वेबिनार विषय -” करिअर इन लाईफ सायन्सेस ” असून या विषयाचे मार्गदर्शन- कु.विधी सुभाष पळसापुरे (संस्थापक, माझा करिअर गाईड फाउंडेशन यांनी केले. वेबिनार चे वैशिष्ट्ये-लाईफ सायन्सेस म्हणजे काय?,मेडिकल व इंजिनिअरिंग शिवाय इतर करिअर मधील उपलब्ध संधी,संशोधन क्षेत्रातील करिअर चा नविन मार्ग,परदेशातल्या लाईफ सायन्सेस मधील स्कोप वसरकारी व गैर सरकारी उपलब्ध शिष्वृत्ती या विषयावर मुद्देसूद चर्चा संपन्न झाली. या प्रसंगी फाउंडेशन चे पदाधिकारी, विद्यार्थी वर्ग व त्यांचे पालक उपस्थित होते.