Mazha Career Guide Foundation

माझा करिअर गाईड फाउंडेशन चा उपक्रम

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेले व्यासपीठ – माझा करिअर गाईड फाउंडेशन, लातूर ने जिल्हा परिषद प्रशाळा, हरंगूळ(खु), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठीकरिअर इन मायक्रोबायलॉजीया विषयावर दिनांक २८/०१/२०२२ रोजी जि. प. प्रशालेत सेमिनार चे आयोजन केले. सेमिनार च्या उद्घाटन प्रसंगी लातूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री.भगवान फुलारी, गटशिक्षणाधिकारी श्री.संजय पंचगल्ले, विस्तार अधिकारी श्री.धनराज गित्ते, विमा प्रतिनिधी श्री. युवराज बिडवे मासालकर, प्राचार्य श्री.राजकुमार कांबळे तसेच फाउंडेशन चे पदाधिकारी श्री. सुभाष पळसापुरे, श्रीमती. दर्शना  पळसापुरे, श्री.आकाश पळसापुरे व श्री. आशुतोष काळे यांची उपस्थिती होती. सेमिनार चे मार्गदर्शन ,संशोधक, समाज सेविका व माझा करिअर गाईड फाउंडेशन चे संस्थापक कु. विधी सुभाष पळसापुरे यांनी केले.सुमारे ८०-९० विद्यार्थ्यांनी सेमिनार चा लाभ घेतला. माझा करिअर गाईड फाउंडेशन, लातूर विद्यार्थी जीवनाला यशस्वीेतेकडे नेण्याकरिता अथक प्रयत्न घेत आहे. आपण ही ह्या चळवळीत सहभागी व्हावे व माझा करिअर गाईड या फेसबूक पेज ला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करावे असे आव्हान कु.विधी पळसापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. प्रकाश जाधव, श्री. तुळशीराम शेळके, सौ.आम्रपाली गंगावणे, सौ. रत्नप्रभा वाघमोडे मॅडम व सूत्रसंचालन नरसिंगे सर यांनी केले.